स्तोत्रसंहिता Chapter 118

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 118 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 118 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 118

अध्याय 118

1. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.

2. इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

3. याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

4. परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

5. मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.

6. परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.

7. परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.

8. परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

9. परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

10. बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.

11. शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

12. शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

13. माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.

14. परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.

15. चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.

16. परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.

17. मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.

18. परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.

19. चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.

20. ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.

21. परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.

22. इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.

23. हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.

24. आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.

25. लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.

26. परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”

27. परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.

28. परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.

29. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.

About स्तोत्रसंहिता Chapter 118

Read स्तोत्रसंहिता Chapter 118 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 118
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 118 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 118?

स्तोत्रसंहिता Chapter 118 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 118 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. उत्पत्ती Chapter 8
  2. रूथ Chapter 1
  3. यशया Chapter 58
  4. 2 इतिहास Chapter 2
  5. जखऱ्या Chapter 6
  6. योएल Chapter 3
  7. यशया Chapter 18

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 37
  2. स्तोत्रसंहिता Chapter 146
  3. स्तोत्रसंहिता Chapter 47
  4. स्तोत्रसंहिता Chapter 10
  5. स्तोत्रसंहिता Chapter 142
  6. स्तोत्रसंहिता Chapter 1
  7. स्तोत्रसंहिता Chapter 30

Related Chapters & Readings

  1. 1 करिंथकरांस Chapter 7
  2. निर्गम Chapter 4
  3. लूक Chapter 1
  4. लेवीय Chapter 27
  5. 1 शमुवेल Chapter 31
  6. लूक Chapter 2
  7. उत्पत्ती Chapter 47
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *