गीतरत्न Chapter 4

For English

Read गीतरत्न Chapter 4 Online

Read गीतरत्न Chapter 4 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गीतरत्न in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of गीतरत्न and the Holy Bible online.

Choose a Chapter

गीतरत्न 4

अध्याय 4

1. प्रिये, तू किती सुंदर आहेस! सखे, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात. तुझे केस लांब आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.

2. तुझे दात तुकतीच आंघोळ करुन आलेल्या बकऱ्या सारखे आहेत. त्या सर्व जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्या पैकी कुणीही आपले बाळ गमावलेले नाही.

3. तुझे ओठ लाल रंगाच्या रेशमाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. घुंगटाखाली तुझ्या कपाळाच्या दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.

4. तुझी मान दाविदाच्या मनोऱ्याप्रमाणे बारीक आणि लांब आहे. त्या मनोऱ्यांच्या भिंती बलशाली सैनिकांच्या एक हजार ढालींनी शोभिंवंत केल्या होत्या.

5. तुझी वक्षस्थळे कमलपुष्पांत चरत असलेल्या जुळ्या हरिणश्रावकासारखी आहेत, मृगीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत.

6. दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या उदाच्या पर्वतावर जाईन.

7. प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.

8. लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनमधून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्यांच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.

9. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस. फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.

10. माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे, प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.

11. माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे.

12. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू कुलुपबंद केलेल्या बागेसारखी शुध्द आहेस. तू बंदिस्त तळ्यासारखी, कारंज्यासारखी आहेस.

13. तुझे अवयव डाळिंबाने आणि इतर फळांनी सर्व प्रकारच्या सुगंधी पदार्थांनी, मेंदी,

14. जटामासी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरु व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.

15. तू बागेतल्या कारंज्यासाखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.

16. उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे आणि तिथली गोड फळे चाखू दे.

About गीतरत्न Chapter 4

Read गीतरत्न Chapter 4 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गीतरत्न in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: गीतरत्न
Chapter: 4
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading गीतरत्न. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading गीतरत्न Chapter 4 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is गीतरत्न Chapter 4?

गीतरत्न Chapter 4 is part of the Book of गीतरत्न in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete गीतरत्न Chapter 4 online for free with easy chapter navigation.

More Chapters from गीतरत्न

  1. गीतरत्न Chapter 5
  2. गीतरत्न Chapter 2
  3. गीतरत्न Chapter 7
  4. गीतरत्न Chapter 3
  5. गीतरत्न Chapter 8
  6. गीतरत्न Chapter 6
  7. गीतरत्न Chapter 1

Explore More from जुना करार

  1. स्तोत्रसंहिता Chapter 58
  2. लेवीय Chapter 8
  3. अनुवाद Chapter 23
  4. 2 राजे Chapter 12
  5. लेवीय Chapter 27
  6. स्तोत्रसंहिता Chapter 111
  7. यिर्मया Chapter 29

Related Chapters & Readings

  1. निर्गम Chapter 38
  2. 2 इतिहास Chapter 17
  3. दानीएल Chapter 9
  4. 1 करिंथकरांस Chapter 1
  5. उपदेशक Chapter 10
  6. यिर्मया Chapter 7
  7. 1 इतिहास Chapter 27
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *