स्तोत्रसंहिता Chapter 51

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 51 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 51 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 51

अध्याय 51

1. देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.

2. देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.

3. मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.

4. तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.

5. मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.

6. देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.

7. मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफर्पोक्षा शुभ्र होईन.

8. मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.

9. माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक.

10. देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.

11. मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.

12. मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो, मला पुन्हा तुझा आनंद दे, माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.

13. पापी लोकांनी कसे राहावे अशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिकवीन. आणि ते तुझ्याकडे परत येतील देवा, मला खुनी समजू नकोस.

14. देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे.

15. प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.

16. तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही.

17. देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्दयाकडे पाठ फिरवणार नाहीस.

18. देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा.यरुशलेमच्या भिंती बांध.

19. नंतर तू चांगले बळी उपभोगू शकशील आणि होमार्पणे ही तू उपभोगशील. आणि लोक पुन्हा तुझ्या वेदीवर बैलांचा बळी देतील.

About स्तोत्रसंहिता Chapter 51

Read स्तोत्रसंहिता Chapter 51 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 51
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 51 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 51?

स्तोत्रसंहिता Chapter 51 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 51 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. जखऱ्या Chapter 6
  5. 2 इतिहास Chapter 2
  6. योएल Chapter 3
  7. यशया Chapter 18

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 81
  2. स्तोत्रसंहिता Chapter 18
  3. स्तोत्रसंहिता Chapter 53
  4. स्तोत्रसंहिता Chapter 86
  5. स्तोत्रसंहिता Chapter 33
  6. स्तोत्रसंहिता Chapter 78
  7. स्तोत्रसंहिता Chapter 83

Related Chapters & Readings

  1. स्तोत्रसंहिता Chapter 141
  2. स्तोत्रसंहिता Chapter 144
  3. ईयोब Chapter 15
  4. स्तोत्रसंहिता Chapter 2
  5. ईयोब Chapter 41
  6. नीतिसूत्रे Chapter 11
  7. 1 थेस्सलनीकाकरांस Chapter 2
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *