एज्रा Chapter 8

For English

Read एज्रा Chapter 8 Online

Read एज्रा Chapter 8 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of एज्रा in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of एज्रा and the Holy Bible online.

Choose a Chapter

एज्रा 8

अध्याय 8

1. बाबेलहून यरुशलेमला माझ्याबरोबर, (म्हणजे एज्रारोबर) आपापल्या घराण्यातली जी वडीलधारी मंडळी आणि इतर लोक आले त्यांची नावे आता देतो. अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीत आम्ही यरुशलेमला आलो. त्या सर्वाची नावे पुढीलप्रमाणे:

2. फिनहासाच्या वंशजांमधला गर्षोम, इथामारच्या वंशजांमधला दानीएल, दावीदच्या वंशजांपैकी हट्टूश,

3. शखन्याच्या वंशजातील परोशाच्या वंशजांमधला जखऱ्या, आणि आणखी 150 जण,

4. पहथ-मवाबाच्या वंशजातल्या जरह याचा मुलगा एल्यहोवेनय आणि त्याच्याबरोबरचे 200 लोक,

5. जट्टूच्या वंशजातल्या यहजोएलचा मुलगा शखन्या आणि 300 पुरुष.

6. आदीनच्या वंशजातल्या योनाथानाचा मुलगा एबद आणि त्याच्याबरोबचे 50 जण.

7. एलामाच्या वंशजातल्या अथल्याचा मुलगा यशाया आणि त्याच्याबरोबरचे 70 जण.

8. शफाट्याच्या वंशजातल्या मीखाएलचा मुलगा जबद्या आणि त्याच्याबरोबरचे 80 जण.

9. यवाबच्या वंशजातील यहीएलचा मुलगा ओबद्या आणि आणखी 218 जण.

10. बानीच्या वंशजातल्या योसिफ्याचा मुलगा शलोमिथ आणि त्याच्या बरोबरचे 160 लोक.

11. बेबाईच्या वंशजातील बेबाईचा मुलगा जखऱ्या आणि त्याच्याबरोबरचे 28 लोक.

12. अजगादच्या वंशजातल्या हक्काटानाचा मुलगा योहानान आणि त्याच्याबरोबरचे 110 लोक.

13. अदोनीकामच्या वंशजातले शेवटचे म्हणजे अलीफलेट, येऊएल, शमाया आणि त्यांच्याबरोबरचे 60 जण

14. आणि बिगवईच्या कुळातले उथई, जक्कूव त्यांच्याबरोबरचे 70 जण.

15. मी (म्हणजे एज्राने) या सर्व लोकांना अहवाकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मला असे समजले की या लोकांमध्ये याजक होते पण लेवी नव्हते.

16. तेव्हा, अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखऱ्या, आणि मशल्लूम या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान या अध्यापकांना मी निरोप पाठवून बोलवून आणले.

17. त्यांना इद्दोकडे पाठवले. इद्दो हा कासिक्या नगराचा मुख्य. त्याला आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी या मंडळींना सांगितले होते. इद्दोचे नातलगांना कासिक्याच्या मंदिरातील सेवेकरी होते. परमेश्वराच्या मंदिरातील सेवाचाकरी प्रीत्यर्थ माणसे मिळावीत म्हणून मी माझ्या लोकांना इद्दोकडे पाठवले.

18. देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे काहीजणांना पाठवले.लेवी वंशजातील महलीच्या वंशातला एक हुषार माणूस शेरेब्या महली हा लेवीच्या मुलांपैकी एक. लेवी हा इस्राएलांच्या वंशातलाच. शेरेब्याचे मुलगे आणि भाऊ यांनाही त्यांनी पाठवले. त्या वंशंजातील एकंदर अठराजण आमच्याकडे आले.

19. मरारी वंशातील हशब्या आणि यशाया आणि त्यांचे भाऊ व भाचे, असे एकंदर वीस जण.

20. शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवाचाकरीसाठी दोनशेवीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवींचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.

21. तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता.

22. प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.”

23. म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला.

24. तेव्हा मी याजकांमध्ये जे प्रमुख होते अशा बारा जणांची निवड केली. मी शेरेब्या, हशब्या आणि त्यांचे आणखी दहा भाऊ यांची निवड केली.

25. मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर चीजवस्तू यांचे नीट वजन करुन या गोष्टी मी या बारा याजकांना दिल्या. या वस्तू राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि बाबेलमधील इस्राएल लोक यांनी दिल्या होत्या.

26. मी वजन केले त्याप्रमाणे चांदी 25 टन भरली, चांदीची तबके आणि इतर वस्तू 3 3/4 टन भरल्या. सोने 3 3/4 टन होते.

27. शिवाय मी सोन्याचे वीस कटोरे त्यांना दिले, त्यांचे वजन एकोणीस पौंड भरले. याखेरीज, सोन्याइतकीच किंमती अशी चकचकीत पितळेची दोन सुंदर तकबे मी त्यांना दिली.

28. मग मी त्या बारा याजकांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी दिलेली आहे.

29. तेव्हा त्यांची काळजीपूर्वक जपवणूक करा. या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या प्रमुखांच्या हवाली करेपर्यंत त्यांची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तुम्ही या वस्तू मुख्य लेवी आणि इस्राएलमधील वडीलधारी मंडळी यांच्या हाती सोपवा. ते त्यांचे वजन करुन त्या गोष्टी यरुशलेममधील मंदिराच्या खोल्यांमध्ये ठेवतील.”

30. यावर, एज्राने वजन करुन दिलेल्या खास भेटवस्तू आणि चांदी सोने याजकांनी व लेवींनी ताब्यात घेतले. यरुशलेममधील मंदिरात त्यांना घेऊन जाण्यास सांगण्यात आले.

31. पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी आम्ही अहवा नदीपासून यरुशलेमला जायला निघालो. देवाची आमच्यावर कृपा असल्यामुळे त्याने वैरी आणि वाटमारे यांच्यापासून आमचे संरक्षण केले.

32. आम्ही यरुशलेमला पोचलो. तेथे तीन दिवस विश्रांती घेतली.

33. चौच्या दिवशी मंदिरात गेलो आणि सोने – चांदी व इतर वस्तू वजन करुन उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे दिल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.

34. आम्ही प्रत्येक गोष्टीची मोजणी, वजन केले आणि एकंदर वजनाची नोंद केली.

35. त्यांनंतर बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांनी इस्राएलच्या देवाला यज्ञार्पणे वाहिली. सर्व इस्राएलकरता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी देवाला यज्ञात अर्पण केले.

36. मग या लोकांनी राजा अर्तहशश्तने दिलेले पत्र राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच फरात नदीच्या पश्र्चिमेकडील भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांना आणि मंदिराला सहाय्य केले.

About एज्रा Chapter 8

Read एज्रा Chapter 8 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of एज्रा in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: एज्रा
Chapter: 8
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading एज्रा. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading एज्रा Chapter 8 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is एज्रा Chapter 8?

एज्रा Chapter 8 is part of the Book of एज्रा in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete एज्रा Chapter 8 online for free with easy chapter navigation.

More Chapters from एज्रा

  1. एज्रा Chapter 4
  2. एज्रा Chapter 5
  3. एज्रा Chapter 10
  4. एज्रा Chapter 1
  5. एज्रा Chapter 10
  6. एज्रा Chapter 4
  7. एज्रा Chapter 2

Explore More from जुना करार

  1. स्तोत्रसंहिता Chapter 80
  2. यहोशू Chapter 16
  3. गणना Chapter 26
  4. स्तोत्रसंहिता Chapter 28
  5. स्तोत्रसंहिता Chapter 6
  6. उत्पत्ती Chapter 38
  7. यशया Chapter 64

Related Chapters & Readings

  1. मत्तय Chapter 15
  2. अनुवाद Chapter 26
  3. जखऱ्या Chapter 10
  4. यिर्मया Chapter 16
  5. फिलिप्पैकरांस Chapter 4
  6. 1 इतिहास Chapter 20
  7. 1 राजे Chapter 21
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *