2 शमुवेल Chapter 4

For English

Read 2 शमुवेल Chapter 4 Online

Read 2 शमुवेल Chapter 4 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of 2 शमुवेल in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of 2 शमुवेल and the Holy Bible online.

Choose a Chapter

2 शमुवेल 4

अध्याय 4

1. हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व लोक भयभीत झाले.

2. तेव्हा दोन माणसे ईश-बोशेथला भेटायला आले. ते दोघे सेनानायक असून रेखाब आणि बाना ही त्यांची नावे. हे रिम्मोनचे मुलगे (रिम्मोन हा बैरोथचा बैरोथ नगर बन्यामिन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत.

3. पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.)

4. शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्याला घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.

5. बैरोथच्या रिम्मोनची मुले. रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता.

6. गहू घेण्याच्या मिषाने रेखाब आणि बाना घरात घुसले. आपल्या शयनगृहात तेव्हा ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करुन या दोघांनी त्याला ठार मारले. त्याचे शिर धडावेगळे करुन ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत.

8. ते हेब्रोन येथे पोचले. आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले.रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शिक्षा केली.”

9. पण दावीद त्या दोघांना म्हणाला, “देवाशपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटांतून सोडवले आहे.

10. यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्याला वाटले या बातमीबद्दल मी त्याला बक्षीस देईन पण मी त्याला धरून सिकलाग येथे ठार केले.

11. तुम्हालाही आता ठार करुन या भूमीवरुन नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या माणसाला तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”

12. असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.

About 2 शमुवेल Chapter 4

Read 2 शमुवेल Chapter 4 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of 2 शमुवेल in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: 2 शमुवेल
Chapter: 4
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading 2 शमुवेल. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading 2 शमुवेल Chapter 4 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is 2 शमुवेल Chapter 4?

2 शमुवेल Chapter 4 is part of the Book of 2 शमुवेल in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete 2 शमुवेल Chapter 4 online for free with easy chapter navigation.

More Chapters from 2 शमुवेल

  1. 2 शमुवेल Chapter 12
  2. 2 शमुवेल Chapter 6
  3. 2 शमुवेल Chapter 24
  4. 2 शमुवेल Chapter 17
  5. 2 शमुवेल Chapter 10
  6. 2 शमुवेल Chapter 23
  7. 2 शमुवेल Chapter 15

Explore More from जुना करार

  1. स्तोत्रसंहिता Chapter 116
  2. 1 राजे Chapter 21
  3. 1 शमुवेल Chapter 6
  4. 1 राजे Chapter 22
  5. 2 राजे Chapter 25
  6. स्तोत्रसंहिता Chapter 49
  7. 2 शमुवेल Chapter 23

Related Chapters & Readings

  1. निर्गम Chapter 35
  2. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 28
  3. यिर्मया Chapter 49
  4. योना Chapter 3
  5. आमोस Chapter 5
  6. यहेज्केल Chapter 27
  7. 2 इतिहास Chapter 28
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *