एज्रा Chapter 1

For English

Read एज्रा Chapter 1 Online

Read एज्रा Chapter 1 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of एज्रा in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of एज्रा and the Holy Bible online.

Choose a Chapter

एज्रा 1

अध्याय 1

1. कोरेश पारसचा राजा असताना त्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने त्याला एक घोषण करायला उद्युक्त केले. कोरेशने राज्यभर या फर्मानाची दवंडी पिटवली तसेच ते लिहूनही काढले. यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने वदविलेले वचन प्रत्यक्षात यावे म्हणून देवाची ही प्रेरणा होती. घोषणा पुढीलप्रमाणे होती:

2. पारसचा राजा कोरेश म्हणतो:“स्वर्गातील देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत; यहूदातील यरुशलेम येथे त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले.

3. यरुशलेममध्ये असलेला देव हाच इस्राएलचा परमेश्वर आहे. तुमच्या पैकी देवाचे जे लोक असतील त्यांचे तो भले करो, अशी मी प्रार्थना करतो. त्यांना यहूदातील यरुशलेममध्ये जाऊन परमेश्वररासाठी मंदिर बांधू द्यावे.

4. आणि इस्राएलांपैकी जे कोणी शत्रूच्या तावडीतून बचावले असतील त्यांना ते असतील त्या ठिकाणच्या लोकांनी साहाय्य करावे. त्यांना चांदी, सोने, गायी-गुरे इत्यादी गोष्टी द्याव्यात. यरुशलेममधील मंदिरासाठी स्वखुशीने दाने द्यावीत.”

5. तेव्हा यहूदा व बन्यामीनच्या घराण्यातील वडीलधाऱ्यांनी यरुशलेमला निघायची तयारी केली; मंदिर बांधण्यासाठी ते यरुशलेमला चालले होते. ज्यांना ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती असे सगळेच यरुशलेमला जायला तयार झाले.

6. त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना उदारपणे अनेक भेटवस्तू दिल्या. चांदी, सोने, पशू अशा मौल्यवान ऐंवजाचा त्यात समावेश होता.

7. शिवाय नबुखद्नेस्सरने यरुशलेमच्या मंदिरातील वस्तू काढून ज्या ठिकाणी त्याने आपले खोटे देव ठेवले होते. अशा स्वत:च्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या राजा कोरेशने बाहेर काढल्या.

8. पारसच्या कोरेश राजाने आपला कोशाधिकारी मिथ्रदाथ याला हे काम सांगितले. त्याने त्या काढून शेशबस्सर या यहूदी प्रमुखाच्या स्वाधीन केल्या

9. मिथ्रदाथने काढून आणलेल्या मंदिरातील वस्तू पुढीलप्रमाणे:सोन्याची तबके 30चांदीची तबके 1,000सुऱ्या व 92

10. सोन्याचे कटोरे 30त्याच प्रकारचे चांदीचे कटोरे 410इतर पात्रे 1,000

11. चांदी -सोन्याच्या सर्व मिळून 5,400 वस्तू होत्या. बाबेलमधून कैदी यरुशलेमला परत आले त्यावेळी शेशबस्सराने या सर्व वस्तू आणल्या.

About एज्रा Chapter 1

Read एज्रा Chapter 1 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of एज्रा in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: एज्रा
Chapter: 1
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading एज्रा. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading एज्रा Chapter 1 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is एज्रा Chapter 1?

एज्रा Chapter 1 is part of the Book of एज्रा in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete एज्रा Chapter 1 online for free with easy chapter navigation.

More Chapters from एज्रा

  1. एज्रा Chapter 4
  2. एज्रा Chapter 5
  3. एज्रा Chapter 2
  4. एज्रा Chapter 10
  5. एज्रा Chapter 8
  6. एज्रा Chapter 6
  7. एज्रा Chapter 7

Explore More from जुना करार

  1. जखऱ्या Chapter 10
  2. निर्गम Chapter 12
  3. शास्ते Chapter 13
  4. स्तोत्रसंहिता Chapter 60
  5. यशया Chapter 30
  6. 1 राजे Chapter 14
  7. स्तोत्रसंहिता Chapter 96

Related Chapters & Readings

  1. शास्ते Chapter 19
  2. यशया Chapter 60
  3. यहेज्केल Chapter 7
  4. आमोस Chapter 5
  5. उत्पत्ती Chapter 47
  6. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 2
  7. निर्गम Chapter 23
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *