1 तीमथ्याला Chapter 4

For English

Read 1 तीमथ्याला Chapter 4 Online

Read 1 तीमथ्याला Chapter 4 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of 1 तीमथ्याला in the New Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of 1 तीमथ्याला and the Holy Bible online.

Choose a Chapter

1 तीमथ्याला 4

अध्याय 4

1. आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,

2. आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्यां कडे लक्ष देेतील.

3. ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्रपदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत, व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत.

4. कारण देवाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे व जर उपकार मानून आम्ही घेतो तर कोणतीही गोष्ट नाकारु नये.

5. कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.

6. तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधुभगिनींना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

7. परंतु देवहीन गोष्टी, ज्या म्हाताऱ्या स्त्रियांचे लक्षण आहे ते टाळ आणि स्वत:ला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव.

8. कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.

9. हे सत्य वचन आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे.

10. म्हणून आम्ही जास्त काम करतो आणि धडपड करतो. कारण आम्ही, जो सर्व लोकांचा व विशेषेकरून जे विश्वास ठेवतात, अशा विश्वासणाऱ्यांचा विशेषकरुन तारणारा आहे त्या जिवंत देवावर आशा ठेवली आहे.

11. आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव.

12. तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये. त्याऐवजी, विश्वासणाऱ्यांसाठी तू तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शविण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो.

13. मी येईर्पांत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात, बोध करण्यात व शिकविण्यात स्वत:ला वाहून घे.

14. जेव्हा वडीलजनांनी तुझ्यावर हात ठेवला त्यावेळी भविष्याच्या संदेशाचा परिणाम म्हणून तुला मिळालेली देणगी जी तुझ्यामध्ये आहे, त्याविषयी निष्काळजी राहू नको.

15. या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी.

16. आपणांकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वत:चे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.

About 1 तीमथ्याला Chapter 4

Read 1 तीमथ्याला Chapter 4 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of 1 तीमथ्याला in the New Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: 1 तीमथ्याला
Chapter: 4
Testament: New Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading 1 तीमथ्याला. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading 1 तीमथ्याला Chapter 4 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is 1 तीमथ्याला Chapter 4?

1 तीमथ्याला Chapter 4 is part of the Book of 1 तीमथ्याला in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete 1 तीमथ्याला Chapter 4 online for free with easy chapter navigation.

More Chapters from 1 तीमथ्याला

  1. 1 तीमथ्याला Chapter 2
  2. 1 तीमथ्याला Chapter 3
  3. 1 तीमथ्याला Chapter 1
  4. 1 तीमथ्याला Chapter 6
  5. 1 तीमथ्याला Chapter 5

Explore More from नवा करार

  1. मत्तय Chapter 5
  2. प्रकटीकरण Chapter 14
  3. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 4
  4. योहान Chapter 12
  5. 2 करिंथकरांस Chapter 6
  6. 2 करिंथकरांस Chapter 2
  7. मत्तय Chapter 26

Related Chapters & Readings

  1. नीतिसूत्रे Chapter 17
  2. स्तोत्रसंहिता Chapter 111
  3. यहेज्केल Chapter 11
  4. हबक्कूक Chapter 1
  5. इफिसकरांस Chapter 6
  6. स्तोत्रसंहिता Chapter 134
  7. स्तोत्रसंहिता Chapter 100
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *