Read मत्तय Chapter 26 Online
Read मत्तय Chapter 26 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of मत्तय in the New Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of मत्तय and the Holy Bible online.
Choose a Chapter
मत्तय 26
अध्याय 26
1. येशूने या सर्व बोधकथा सांगण्याचे संपविल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,
2. “परवा वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हांला माहीत आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल.”
3. मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कयफा होते.
4. सभेत त्यांनी धूर्तपणे येशूला अटक करण्याचा आणि जिवे मारण्याच्या कट केला.
5. तरीही ते म्हणत होते, “वल्हांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल.”
6. येशू बेथानीमध्ये होता, तो शिमोन कुष्ठरोग्याच्या घरात होता.
7. येशू तेथे असताना एक बाई त्याच्याकडे आली. उंची अत्तराने भरलेली अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती. येशू जेवत असता ही कुपी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली.
8. त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, “या अत्तराचा असा नाश का व्हावा?
9. ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.
10. येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या बाईला का त्रास देत आहा? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे.
11. गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.
12. या बाईने माझ्या शरीरावर हे अत्तर ओतले. मला पुरण्याचा वेळेची तयारी तिने केली.
13. मी तुम्हांला खरे सांगतो, सर्व जगातील लोकांना सुवार्ता सांगितली जाईल आणि जेथे सुवार्ता सांगण्यात येईल तेथे या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून करण्यात येईल.”
14. बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला.
15. यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही महा काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.
16. तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
17. बेखमीर भाकारीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “वल्हांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वल्हांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”
18. येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘गुरूजी म्हणतात: माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करणार आहे.”‘
19. येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.
20. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला.
21. जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो: तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”
22. ते खूप दु:खी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येक जण त्याला विचारु लागला, “तो मी नाही ना प्रभु?”
23. मग येशूने उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करील.
24. जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल, पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दु:ख वाटते! तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.”
25. मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “तो मी आहे का, गुरूजी?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे (म्हणजे होय तो तूच आहेस.”)
26. ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले. आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “हे घ्या आणी खा. हे माझे शरीर आहे.”
27. नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातील प्यावे. कारण हे माझे रक्त आहे,
28. हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे. यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी.
29. मी तुम्हांला सांगतो: माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही.”
30. मग त्यांनी वल्हांडणाचे गीत गाईले. नंतर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.
31. येशूने सांगितले, “आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी शंकाकुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहेले आहे: ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ ज्खऱ्याा 13:7
32. पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन,
33. उत्तर देताना पेत्र म्हणाला, “इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही!”
34. येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वा तू तीन वेळा म्हणशील.”
35. पेत्र म्हणाला, “तुम्हांला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही. मग मला तुमच्याबरोबर मरावे लागले तरी हरकत नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा असेच म्हणाले.
36. नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.”
37. येशूने पेत्र आणि दोन जब्दीचे पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दु:खी व व्याकूळ होऊ लागला.
38. येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझे दु:ख मला इतके झाले आहे की, ते मला मारून टाकील. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
39. तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दु:खाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
40. मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय?
41. आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. यासाठी की तुम्ही मोहात पडू नये. जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करी इच्छितो, पण तुमचे शरीर अशक्त आहे.”
42. नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दु:खाचा हा प्याला पिणे मला अटळच आहे तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”
43. नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते.
44. नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले.
45. यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विश्रांतिच घेत आहात का? ऐका! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे.
46. उठा! आपल्याला निघालेच पाहिजे. हा पाहा, मला धरून शत्रूंच्या हाती देणारा येत आहे.”
47. येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजन यांनी त्यांना पाढविले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते.
48. येशूला विश्वासघाताने धरून लोकांच्या हाती देणारा यहूदा याने हाच येशू आहे याविषयी एक खूण सांगितली होती. यहूदा म्हणाला, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय; त्याला तुम्ही धरा,”
49. मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
50. येशू त्याला म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर!” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले.
51. हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने प्रमुख याजकाच्या नोकराचा कान कापला.
52. येशू त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात.
53. मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कळत नाही काय?
54. परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”
55. यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही.
56. परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यानी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
57. त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते.
58. पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकरांसोबत बसला.
59. येशूला मरणदंड द्यावा म्हणून मूख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरूद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले.
60. पुष्कळ लोक पुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली,
61. “हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”
62. तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरूद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”
63. पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”
64. येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हांला सांगतो: ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”
65. जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध दुर्भाषण केले आहे! आम्हांला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. ह्याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले!
66. तुम्हांला काय वाटते?”यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे.”
67. तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.
68. ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?ʈ
69. यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. प्रमुख याजकाच्या दासीपैंकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालीलच्या येशूबरोबर होतास.”
70. पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही!”
71. मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, “नासरे थकर येशूबरोबर हा होता.”
72. पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारतांना, म्हणाला, “मी त्याला ओळखत नाही!”
73. काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट दिसून येते.”
74. मग तो स्वत:ला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवाला.
75. नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दु:खतिशयाने रडला.
About मत्तय Chapter 26
Read मत्तय Chapter 26 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of मत्तय in the New Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: मत्तय
Chapter: 26
Testament: New Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading मत्तय. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading मत्तय Chapter 26 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is मत्तय Chapter 26?
मत्तय Chapter 26 is part of the Book of मत्तय in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete मत्तय Chapter 26 online for free with easy chapter navigation.
More Chapters from नवा करार
- फिलेमोन Chapter 1
- लूक Chapter 12
- योहान Chapter 19
- मत्तय Chapter 9
- योहान Chapter 9
- लूक Chapter 1
- मत्तय Chapter 7
Explore More from मत्तय
- मत्तय Chapter 10
- मत्तय Chapter 22
- मत्तय Chapter 13
- मत्तय Chapter 14
- मत्तय Chapter 27
- मत्तय Chapter 15
- मत्तय Chapter 24