Read गणना Chapter 33 Online
Read गणना Chapter 33 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of गणना and the Holy Bible online.
Choose a Chapter
गणना 33
अध्याय 33
1. मोशे आणि अहरोन यांनी इस्राएल लोकांना मिसरामधून लहान लहान टोव्व्यांनी बाहेर काढले. त्यांनी ज्या ज्या देशांतून प्रवास केला ते या प्रमाणे:
2. त्यांनी जेथे जेथे प्रवास केला त्याबद्दल मोशेने लिहिले आहे. परमेश्वराला जे हवे होते तेच मोशेने लिहिले. ते ज्या ठिकाणी गेले ती ठिकाणे आणि तेथून ते कधी गेले त्या वेळा या प्रमाणे:
3. पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करुन बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
4. मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
5. इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथला गेले.
6. ते सुक्कोथहून एथामला गेले. लोकांनी तेथे वाळवंटाच्या काठावर तंबू ठोकले.
7. त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बाल-सफोन जवळ होते. लोकांनी मिगदोलसमोर तंबू ठोकले.
8. लोकांनी पीहहीरोथ सोडले आणि ते समुद्रामधून चालत गेले. ते वाळवंटाकडे गेले. नंतर ते तीन दिवस वाळवंटातून चालत होते. लोकांनी मारा येथे तळ दिला.
9. लोकांनी मारा सोडले व ते एलिमला जाऊन राहिले. तिथे 12 पाण्याचे झरे होते आणि 70 खजुराची झाडे होती.
10. लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू ठोकले.
11. त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि त्सीन वाळवंटात तळ दिला.
12. त्सीन वाळवंट सोडून ते दफकाला आले.
13. लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
14. लोकांनी आलूश सोडले व रफिदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.
15. लोकांनी रफिदिम सोडले व त्यांनी सीनाय वाळवंटात तळ दिला.
16. त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.
17. किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.
18. हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू ठोकले.
19. रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.
20. रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.
21. लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.
22. रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.
23. लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.
24. शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
25. लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
26. मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.
27. लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.
28. तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.
29. लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू ठोकले.
30. हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
31. त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानला तळ दिला.
32. बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.
33. होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.
34. याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
35. अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
36. लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन वाळवंटात कादेश येथे तंबू ठोकले.
37. लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
38. याजक अहरोनने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
39. अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो 123वर्षाचा होता.
40. कनान देशातील नेगब जवळ अराद शहर होते. अर्द येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.
41. लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू ठोकले.
42. त्यांनी सलमोना सोडले व ते पुनोनला आले.
43. पूनोन सोडून त्यांनी ओबोथला तळ दिला.
44. लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारिमला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.
45. मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
46. लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन दिबलाथाईमला आले.
47. अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू ठोकले.
48. लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
49. त्यांनी यार्देन नदीच्या यार्देन खोऱ्यात तंबू ठोकले. त्यांचे तंबू बेथ-यारीमोथापासून अकाशीयाच्या शेतापर्यंत होते.
50. त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
51. “इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग: तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
52. तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांच्यापासून तुम्ही तो प्रदेश घ्याल. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
53. तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा प्रदेश तुम्हाला देत आहे. तो तुमच्या कुटुंबाचा होईल.
54. तुमच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग मिळेल. तुम्ही चिठ्ठया टाकून कोणाला कुठली जमीन मिळते ते ठरवाल. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. चिठ्यां कुठल्या कुळाला कुठली जमीन मिळाली ते कळेल. प्रत्येक कुळाला त्याचा स्वत:चा जमिनीचा तुकडा मिळेल.
55. “तुम्ही त्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढा, जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुमच्यावर अनेक संकटे आणतील. ते तुमच्या डोव्व्यातील कुसळासारखे आणि शरीरातल्या काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.
56. मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.”
About गणना Chapter 33
Read गणना Chapter 33 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: गणना
Chapter: 33
Testament: Old Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading गणना. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading गणना Chapter 33 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is गणना Chapter 33?
गणना Chapter 33 is part of the Book of गणना in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete गणना Chapter 33 online for free with easy chapter navigation.