गणना Chapter 25

For English

Read गणना Chapter 25 Online

Read गणना Chapter 25 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of गणना and the Holy Bible online.

Choose a Chapter

गणना 25

अध्याय 25

1. इस्राएल लोक शिद्दीमात रहात असताना त्यांनी मवाबच्या बायकांबरोबर लैंगिक पाप करायला सुरुवात केली.

2. मवाबच्या स्त्रियांनी पुरुषांना आमंत्रण दिले आणि त्यांच्या खोट्या देवतेच्या अर्पणात त्यांना भाग घ्यायला सांगितले. म्हणून इस्राएलचे लोक त्या खोट्या देवतेच्या उपासनेत भाग घेऊ लागले. त्या जागेत, इस्राएल लोकांनी बआल पौरट्ठ्या खोट्या देवताची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वर त्यांच्यावर खूप रागावला.

4. परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना मारून टाक म्हणजे सर्व लोकांना दिसेल.त्यांची प्रेते परमेश्वरासमोर ठेव. नंतर परमेश्वर सर्व इस्राएल लोकांना त्याचा राग दाखवणार नाही.”

5. मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुमच्यापैकी प्रत्येकाने अशा कुटुंब प्रमुखाला शोधले पाहिजे की ज्याने लोकांना बआलपौरट्ठ्या खोट्या देवताची उपासना करायला भाग पाडले. नंतर तुम्ही त्या माणसांना मारून टाका.”

6. त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी (पुढारी) दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले होते. एका इस्राएली माणसाने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भाऊंच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडील धारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते खूप दु:खी झाले.

7. फिनहास हा एलाजारचा मुलगा आणि याजक अहरोन याचा नातू होता. फिनहासने या माणसाला त्या स्त्रीला आणताना पाहिले. म्हणून फिनहासने तंबू सोडला व त्याने त्याची बरची घेतली

8. त्याने त्या इस्राएली माणसाचा त्याच्या तंबूपर्यंत पाठलाग केला. नंतर त्याने त्या इस्राएली माणसाला व मिद्यानी स्त्रीला तिच्या मंडपातमारण्यासाठी बरचीचा उपयोग केला. त्याने बरची त्या दोघांच्या शरीरात खुपसली. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये खूप मोठा आजार पसरला होता. पण फिनहासने त्या दोघांना मारल्यानंतर त्या आजाराचा प्रसार थांबला.

9. या आजारामुळे एकून 24000 लोक मेले.

10. परमेश्वर मोशेला म्हणाला,

11. “माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही.

12. फिनिहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतिचा करार करीत आहे.

13. तो करार हा आहे: तो आणि त्याच्या नंतरचे त्याचे वंशज याजक होतील. कारण आपल्या देवाबद्दलच्या त्याच्या भावना खूप तीव्र होत्या. आणि त्याने ज्या गोष्टी केल्या त्यामुळे इस्राएलचे लोक शुद्ध झाले.

14. मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली माणूस मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.”

15. आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबीहोते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.

16. परमेश्वर मोशेला म्हणाला:

17. “तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानचे लोक तुझे शत्रू आहेत.

18. तू त्यांना ठार मारले पाहिजेस. त्यांनी अगोदरच तुम्हाला त्यांचे शत्रू केले आहे त्यांनी तुला पिओर येथे फसवले आहे. आणि त्यांनी तुला कजबीच्या बाबतीतही नीचपणाने फसवले. ती मिद्यानच्या पुढाऱ्याची मुलगी होती. पण इस्राएल लोकांमध्ये आजार पसरला तेव्हा ती मारली गेली. बआल पौर या खोट्या देवतेची लोकांना फसवून उपासना करायला लावली म्हणून तो आजार इस्राएल लोकांमध्ये पसरला होता.”

About गणना Chapter 25

Read गणना Chapter 25 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: गणना
Chapter: 25
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading गणना. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading गणना Chapter 25 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is गणना Chapter 25?

गणना Chapter 25 is part of the Book of गणना in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete गणना Chapter 25 online for free with easy chapter navigation.

More Chapters from गणना

  1. गणना Chapter 6
  2. गणना Chapter 30
  3. गणना Chapter 24
  4. गणना Chapter 10
  5. गणना Chapter 1
  6. गणना Chapter 32
  7. गणना Chapter 21

Explore More from जुना करार

  1. एज्रा Chapter 9
  2. योएल Chapter 2
  3. स्तोत्रसंहिता Chapter 74
  4. स्तोत्रसंहिता Chapter 17
  5. विलापगीत Chapter 3
  6. गीतरत्न Chapter 8
  7. होशेय Chapter 7

Related Chapters & Readings

  1. गणना Chapter 18
  2. यहेज्केल Chapter 24
  3. फिलेमोन Chapter 1
  4. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 17
  5. योहान Chapter 1
  6. यहेज्केल Chapter 6
  7. यहेज्केल Chapter 18
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *