गणना Chapter 29

For English

Read गणना Chapter 29 Online

Read गणना Chapter 29 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of गणना and the Holy Bible online.

Choose a Chapter

गणना 29

अध्याय 29

1. “सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी खास सभा असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करणार नाही. हा कर्णावाजवण्याचा दिवस आहे.

2. तुम्ही होमार्पणे द्याल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्षांची सात कोकरे अर्पण करा. ती सर्व दोषरहित असावीत.

3. तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ

4. मेंढ्याबरोबर व आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण कराल.

5. एक बकरासुद्धा पापार्पण म्हणून द्या. त्यामुळे तुम्ही शुद्ध व्हाल.

6. अमावास्याचे होमार्पण आणि धान्यार्पण ही नेहमीच्या अर्पणांव्यरिरिक्त असतील. आणि ही रोजच्या धान्यार्पणे व पेयार्पणे यांच्या व्यतिरीक्त असतील. हे सर्व नियमाप्रमाणे केले पाहिजे. ही सर्व अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील.

7. “सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक खास सभा बोलावण्यात येईल. त्या दिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.

8. तुम्ही होमार्पणे द्यायची. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, एक मेंढा आणि एक वर्ष वयाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत.

9. त्याबरोबर तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून बैलाबरोबर, 16 कप पीठ

10. मेंढ्या बरोबर आणि आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण केले पाहिजे.

11. पापार्पण म्हणून तुम्ही एक बकराही अर्पण कराल. प्रायश्चित्ताच्यादिवशी करावयाच्या पापार्पणाबरोबरच ही अर्पणे द्यायची. तसेच रोजच्या बळीच्या, धान्याच्या व पेयाच्या अर्पणाबरोबर ही अर्पणे करावीत.

12. “सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एक खास सभा असेल. तो मंडपाचा सण असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही आणि परमेश्वरासाठी सात दिवसांची खास सुट्टी साजरी करायची.

13. तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही 13 बैल, 2 मेंढे,

14. कोकरे अर्पण कराल. ते सर्व दोषरहित असले पाहिजेत. 14तुम्ही 24 कप पीठ तेलात मिसळून प्रत्येक बैलाबरोबर, 16 कप पीठ प्रत्येक मेंढ्याबरोबर व

15. आठ कप पीठ प्रत्येक कोकरा बरोबर अर्पण करावे.

16. तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. रोजच्या अर्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यातिरिक्त ही अर्पणे असतील.

17. “या सुट्ठीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही 12 बैल, 2 मेंढे आणि 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.

18. बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात धान्यार्पण आणि पेयार्पण केले पाहिजे.

19. एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. ही सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असली पाहिजे.

20. “या सुट्ठीच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही 11 बैल, 2 मेंढे आणि एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असले पाहिजेत.

21. बैल, मेंढे आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण केले पाहिजे.

22. पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे सर्व रोजच्या बळीच्या व धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

23. “सुट्ठीच्या चौथ्या दिवशी तुम्ही 10 बैल, 2 मेंढे व 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करवेत. ते निर्दोष असले पाहिजेत.

24. बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे.

25. एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

26. “सुट्ठीच्या पाचव्या दिवशी तुम्ही 9 बैल, 2 मेंढे व एक वर्षाचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजे. ते दोषरहित असावेत

27. बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण ही केले पाहिजे.

28. एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणा व्यतिरिक्त असले पाहिजे.

29. “सुट्ठीच्या सहाव्या दिवशी तुम्ही 8 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण केले पाहिजेत. ते दोषरहित असावेत.

30. बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण, व पेयार्पणही केले पाहिजे.

31. एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

32. “सुट्ठीच्या सातव्या दिवशी तुम्ही 7 बैल, 2 मेंढे व एक वर्षांचे 14 कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.

33. बैल, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पणही केले पाहिजे.

34. एक बकरा पापार्पण म्हणून द्यावा. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

35. “या सुट्ठीच्या आठव्या दिवशी तुमच्यासाठी एक खास सभा भरवावी. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये.

36. तुम्ही होमार्पण करावे. ते अग्नीबरोबर करायचे अर्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. तुम्ही एक बैल, 1 मेंढा व एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करावेत. ते दोषरहित असावेत.

37. प्रत्येक बैल, मेंढा व कोकरा यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण दिले पाहिजे.

38. एक बकरा पापार्पण म्हणून दिला पाहिजे. हे सर्व रोजच्या बळी, धान्य व पेय यांच्या अर्पणाव्यतिरिक्त असले पाहिजे.

39. “या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”

40. मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांना सांगितल्या.

About गणना Chapter 29

Read गणना Chapter 29 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: गणना
Chapter: 29
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading गणना. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading गणना Chapter 29 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is गणना Chapter 29?

गणना Chapter 29 is part of the Book of गणना in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete गणना Chapter 29 online for free with easy chapter navigation.

More Chapters from गणना

  1. गणना Chapter 6
  2. गणना Chapter 30
  3. गणना Chapter 24
  4. गणना Chapter 14
  5. गणना Chapter 1
  6. गणना Chapter 33
  7. गणना Chapter 32

Explore More from जुना करार

  1. स्तोत्रसंहिता Chapter 65
  2. अनुवाद Chapter 24
  3. विलापगीत Chapter 4
  4. नहेम्या Chapter 12
  5. यहेज्केल Chapter 48
  6. यशया Chapter 28
  7. यिर्मया Chapter 40

Related Chapters & Readings

  1. लेवीय Chapter 2
  2. निर्गम Chapter 10
  3. यिर्मया Chapter 52
  4. यिर्मया Chapter 31
  5. 2 इतिहास Chapter 22
  6. 1 इतिहास Chapter 7
  7. गणना Chapter 15
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *