गीतरत्न Chapter 2

For English

Read गीतरत्न Chapter 2 Online

Read गीतरत्न Chapter 2 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गीतरत्न in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of गीतरत्न and the Holy Bible online.

Choose a Chapter

गीतरत्न 2

अध्याय 2

1. मी शारोनाचे कुंकुमपुष्य (गुलाबपुष्प) आहे. दरीतले कमलपुष्प आहे.

2. प्रिये इतर स्त्रियांमध्ये तू काट्यांतल्या कमलीपुष्पासाखी आहेस.

3. प्रियकरा इतर पुरुषांमध्ये तू रानटी झाडांमध्ये असलेल्या सफरचंदाच्या झाडासारखा आहेस.मला माझ्या प्रियकराच्या सावलीत बसायला आवडते. त्याचे फळ मला गोड लागते.

4. माझ्या सख्याने मला द्राक्षारसाच्या घरात आणले. माझ्यावर प्रेम करायची त्याची इच्छा होती.

5. मनुका देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.

6. माझ्या सख्याचा डावा बाहू माझ्या मस्तकाखाली आहे आणि त्याच्या उजव्या बाहूने त्याने मला धरले आहे.

7. यरुशलेमच्या स्त्रियांनो मला वचन द्या. तुम्हाला वनातील हरिणींची आणि रानमृगांची शपथ घालून विनवते की माझी तयारी होईयर्पंतप्रेम जागृत करु नका.

8. मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते. तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.

9. माझा प्रियकर मृगासारखा, हरिणाच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातूनपहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.

10. माझा प्रियकर माझ्याशी बोलतो, “प्रिये, हे सुंदरी ऊठ आपण दूर जाऊ या!”

11. बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला.

12. शेतात फुले उमलली आहेत, आता गाण्याचे दिवस आले आहेत. ऐक कबूतरे परतली आहेत.

13. अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत. बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे. प्रिये, सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.”

14. माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुला बघू दे. तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तू खूप सुंदर आहेस.

15. आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षाच्या मळ्यांचा नाश केला आहे. आता आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत.

16. माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची. माझा सखा कमलपुष्पांवर जगतो.

17. जेव्हा दिवस शेवटची घटका मोजतो आणि सावल्या लांब पळून जातात प्रियकरा पर्वताच्या कड्यावरच्याहरिणासारखा किंवा लहान हरिणासारखा परत फीर.

About गीतरत्न Chapter 2

Read गीतरत्न Chapter 2 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गीतरत्न in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: गीतरत्न
Chapter: 2
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading गीतरत्न. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading गीतरत्न Chapter 2 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is गीतरत्न Chapter 2?

गीतरत्न Chapter 2 is part of the Book of गीतरत्न in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete गीतरत्न Chapter 2 online for free with easy chapter navigation.

More Chapters from गीतरत्न

  1. गीतरत्न Chapter 5
  2. गीतरत्न Chapter 7
  3. गीतरत्न Chapter 8
  4. गीतरत्न Chapter 6
  5. गीतरत्न Chapter 4
  6. गीतरत्न Chapter 3
  7. गीतरत्न Chapter 1

Explore More from जुना करार

  1. नीतिसूत्रे Chapter 26
  2. नीतिसूत्रे Chapter 15
  3. जखऱ्या Chapter 7
  4. 1 इतिहास Chapter 20
  5. 1 शमुवेल Chapter 24
  6. मलाखी Chapter 4
  7. दानीएल Chapter 7

Related Chapters & Readings

  1. ईयोब Chapter 42
  2. इब्री लोकांस Chapter 11
  3. अनुवाद Chapter 30
  4. 1 करिंथकरांस Chapter 12
  5. 2 तीमथ्याला Chapter 3
  6. होशेय Chapter 3
  7. 1 थेस्सलनीकाकरांस Chapter 2
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *