ईयोब Chapter 23

For English

Read ईयोब Chapter 23 Online

Read ईयोब Chapter 23 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of ईयोब in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of ईयोब and the Holy Bible online.

Choose a Chapter

ईयोब 23

अध्याय 23

1. नंतर ईयोबने उत्तर दिले:

2. “तरीही मी आज कडवटणे तक्रार करीन. का? कारण मी अजूनही दु:खी आहे.

3. देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असेत तर किती बरे झाले असते. देवाकडे कसे जावे ते मला कळते तर किती बरे झाले असते.

4. मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.

5. देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.

6. देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का? नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल.

7. मी सत्यप्रिय माणूस आहे. देव मला माझी गोष्ट सांगू देईल. नंतर माझा न्यायाधीश मला मुक्त करील.

8. “पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.

9. देव दक्षिणेत कार्यमग्र असला तरी मला तो दिसत नाही. देव जेव्हा उत्तरेकडे वळतो तेव्हाही तो मला दिसत नाही.

10. परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल.

11. मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.

12. मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.

13. “परंतु देव कधी बदलत नाही. देवासमोर कुणीही उभा राहू शकणार नाही. देव त्याला हवे ते करु शकतो.

14. माझ्या बाबतीत देवाने जे योजिले आहे तेच तो करेल. माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.

15. म्हणूनच मी देवाला भितो. मी या गोष्टी समजू शकतो आणि म्हणून मला देवाची भीती वाटते.

16. देव माझे हृदय कमजोर बनवतो आणि मी माझे धैर्य गमावून बसतो. सर्वशक्तिमान देव मला घाबरवतो.

17. माझ्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या चेहऱ्यावरच्या काळ्या ढगाप्रमाणे आहेत. परंतु तो काळोख मला गप्प बसवू शकणार नाही.

About ईयोब Chapter 23

Read ईयोब Chapter 23 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of ईयोब in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: ईयोब
Chapter: 23
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading ईयोब. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading ईयोब Chapter 23 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is ईयोब Chapter 23?

ईयोब Chapter 23 is part of the Book of ईयोब in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete ईयोब Chapter 23 online for free with easy chapter navigation.

More Chapters from ईयोब

  1. ईयोब Chapter 2
  2. ईयोब Chapter 37
  3. ईयोब Chapter 26
  4. ईयोब Chapter 40
  5. ईयोब Chapter 29
  6. ईयोब Chapter 30
  7. ईयोब Chapter 24

Explore More from जुना करार

  1. ईयोब Chapter 10
  2. स्तोत्रसंहिता Chapter 37
  3. स्तोत्रसंहिता Chapter 72
  4. यिर्मया Chapter 13
  5. यशया Chapter 59
  6. नीतिसूत्रे Chapter 18
  7. मीखा Chapter 6

Related Chapters & Readings

  1. दानीएल Chapter 2
  2. 1 तीमथ्याला Chapter 5
  3. एज्रा Chapter 10
  4. यिर्मया Chapter 22
  5. स्तोत्रसंहिता Chapter 90
  6. स्तोत्रसंहिता Chapter 3
  7. स्तोत्रसंहिता Chapter 55
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *