इब्री लोकांस Chapter 6

For English

Read इब्री लोकांस Chapter 6 Online

Read इब्री लोकांस Chapter 6 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of इब्री लोकांस in the New Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of इब्री लोकांस and the Holy Bible online.

Choose a Chapter

इब्री लोकांस 6

अध्याय 6

1. म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ.

2. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याविषयीचीशिकवण, डोक्यावर हात ठेवणे, मृतांचे पुुनरुत्थान आणि अनंतकाळचा न्यायनिवाडा, देवावरील विश्र्वास, आपल्या निर्जीव गतजीवनाचा पश्र्च्त्ताप या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये.

3. आणि जर देवाची इच्छा असेल तर आपण पूर्ण ख्रिस्तीपणापर्यंत जाऊ.

4. ज्यांना स्वर्गीय दानांचा अनुभव आलेला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, त्यांना पुन्हा पश्चात्तापाकडे नेणे अशक्य आहे.

5. तसेच देवाच्या वचनाची गोडी अनुभवली आहे, व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याचा अनुभव आहे आणि

6. त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळविणे अशक्य आहे, कारण त्याच्या स्वत:च्या हानीकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्याला आणतात.

7. जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो.

8. पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिति असते; तिचा अग्नीने नाश होईल.

9. बंधूंजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हांला अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल.

10. कारण तुम्ही केलेली पवित्रजनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्यावर केलेले प्रेम ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.

11. पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.

12. आम्हांला असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचे फळ मिळवितात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.

13. जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वत:च्याच नावाने शपथ वाहिली.

14. तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि मी तुझ्या वंशजांना सतत बहुगुणित करीत राहीन.”

15. म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.

16. लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात. कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटविणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते.

17. आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.

18. देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे (त्याचे वचन व शपथ) जे आपण आश्रयाकरिता निघालो आहोत, त्या आपणांस त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.

19. आम्हांला ही आशा जणू काय भक्क म, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा मंदिराच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते,

20. जेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे अनंतकाळासाठी मुख्य याजक झाला आहे.

About इब्री लोकांस Chapter 6

Read इब्री लोकांस Chapter 6 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of इब्री लोकांस in the New Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: इब्री लोकांस
Chapter: 6
Testament: New Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading इब्री लोकांस. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading इब्री लोकांस Chapter 6 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is इब्री लोकांस Chapter 6?

इब्री लोकांस Chapter 6 is part of the Book of इब्री लोकांस in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete इब्री लोकांस Chapter 6 online for free with easy chapter navigation.

More Chapters from इब्री लोकांस

  1. इब्री लोकांस Chapter 7
  2. इब्री लोकांस Chapter 3
  3. इब्री लोकांस Chapter 2
  4. इब्री लोकांस Chapter 8
  5. इब्री लोकांस Chapter 5
  6. इब्री लोकांस Chapter 4
  7. इब्री लोकांस Chapter 1

Explore More from नवा करार

  1. 1 तीमथ्याला Chapter 1
  2. 1 करिंथकरांस Chapter 6
  3. याकोब Chapter 3
  4. मत्तय Chapter 13
  5. 1 करिंथकरांस Chapter 2
  6. मार्क Chapter 2
  7. प्रकटीकरण Chapter 21

Related Chapters & Readings

  1. 2 शमुवेल Chapter 13
  2. 1 इतिहास Chapter 2
  3. स्तोत्रसंहिता Chapter 118
  4. 2 राजे Chapter 7
  5. यशया Chapter 62
  6. योहान Chapter 18
  7. 1 राजे Chapter 20
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *