आमोस Chapter 1

For English

Read आमोस Chapter 1 Online

Read आमोस Chapter 1 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of आमोस in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of आमोस and the Holy Bible online.

Choose a Chapter

आमोस 1

अध्याय 1

1. आमोस तकोवा नगरीतील मेंढपाळ होता. यहूद्यांचा राजा उज्जीया आणि इस्राएलचा राजा यराबाम यांच्या कारकिर्दीत आमोसला दृष्टांन्त झाले. यराबाम योवाशाचा मुलगा होता हे दृष्टांन्त भूकंपाच्या आधी दोन वर्षे झाले त्याचा हा संदेश.

2. आमोस म्हणाला: परमेश्वर सियोनच्या सिंहाप्रमाणे गर्जना करतो. त्याची प्रचंड गुरगुर यरुशलेमपासून ऐकू येते; मेंढपाळांची कुरणे सुकलीत. कर्मेल पर्वतसुध्दा सुकला आहे.

3. परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “दिमीष्कच्या लोकांनी पुष्कळ अपराध केल्यामुळे मी त्यांनी खात्रीने शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादला धान्य मळण्याच्या लोखंडी अवजाराने मारले.

4. मी हजाएलच्या घराला (आरामला) आग लावीन आणि ती आग बेन-हदादच्या उंच मनोव्यांचा नाश करील.

5. “मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे बसणाऱ्याचा मी नाश करीन. बेथ-एदेन राजदंडधारी राजाला मी नष्ट करीन. अरामाच्या लोकांचा पराभव होईल लोक त्यांना कीर देशात नेतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

6. परमेशवर असे म्हणाला, “मी गज्जाच्या लोकांना नक्कीच शिक्षा करीन कारण त्यांनी फार अपराध केले आहेत. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्रावर ताबा मिळवून लोकांना गुलाम म्हणून अदोमला पाठविले.

7. म्हणून मी गज्जाच्या कोटाला आग लावीन. ही आग गज्जाचे उंच मनोरे नष्ट करील

8. अश्दोदच्या गादीवर बसणाव्याचा मी नाश करीन. अष्कलोनच्या राजदंड धारी राजाला मी नष्ट करीन. एक्रोनच्या लोकांना मी सजा देईन. मग अजूनही जिवंत असलेले पलिष्ट्यांचे लोक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

9. परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “सारेच्या पुष्कळ अपराधांबद्दल मी त्यांना नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्र आपल्या ताब्यात घेऊन लोकांना गुलाम करून अदोमला पाठविले. त्यांच्या भावांबरोबर (इस्राएलबरोबर) केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.

10. म्हणून सोरच्या तटबंदीला मी आग लावीन. सोरचे उंच मनोरे त्यामुळे नष्ट होतील.”

11. परमेश्वर असे सांगतो, “अदोमच्या लोकांनी खूप अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच का? कारण अदोमने तलवारीने त्याच्या भावाचा (इस्राएलचा) पाठलाग केला. अदोमला अजिबात दया आली नाही अदोमचा राग कायम राहिला. तो हिंस्त्र पशूप्रमाणे इस्राएलला फाडत राहिला

12. म्हणून मी तेमानला आग लावीन. त्यात बस्राचे मनोरे नष्ट करीन.”

13. परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “अम्मोनींच्या अनेक अपराधांबद्दल मी अमोनला नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादमध्ये गर्भवतींना ठार मारले. तेथील प्रदेश बळकावून आपल्या देशाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी हे केले.

14. म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन. ती राब्बाचे उंच मनोरे भस्मसात करील त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी होत असताना होणाऱ्या आरडाओरडीप्रमाणे आणि वावटळीप्रमाणे संकटे येतील.

15. मग त्यांचा राजा व नेते पकडले जातील. त्यांना बरोबरच दूर नेले जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

About आमोस Chapter 1

Read आमोस Chapter 1 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of आमोस in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: आमोस
Chapter: 1
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading आमोस. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading आमोस Chapter 1 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is आमोस Chapter 1?

आमोस Chapter 1 is part of the Book of आमोस in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete आमोस Chapter 1 online for free with easy chapter navigation.

More Chapters from आमोस

  1. आमोस Chapter 7
  2. आमोस Chapter 3
  3. आमोस Chapter 5
  4. आमोस Chapter 9
  5. आमोस Chapter 4
  6. आमोस Chapter 8
  7. आमोस Chapter 2

Explore More from जुना करार

  1. 1 शमुवेल Chapter 1
  2. 2 इतिहास Chapter 19
  3. यशया Chapter 27
  4. 2 राजे Chapter 21
  5. एस्तेर Chapter 5
  6. अनुवाद Chapter 10
  7. यहोशू Chapter 16

Related Chapters & Readings

  1. उपदेशक Chapter 12
  2. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 28
  3. स्तोत्रसंहिता Chapter 37
  4. गणना Chapter 11
  5. मत्तय Chapter 4
  6. स्तोत्रसंहिता Chapter 138
  7. स्तोत्रसंहिता Chapter 150
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *