निर्गम Chapter 24

For English

Read निर्गम Chapter 24 Online

Read निर्गम Chapter 24 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of निर्गम in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of निर्गम and the Holy Bible online.

Choose a Chapter

निर्गम 24

अध्याय 24

1. देवाने मोशेला सांगितले, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर येऊन दुरुनच माझी उपासना करा;

2. मग मोशे एकटाच परमेश्वरा जवळ येईल; इतरांनी परमेश्वराजवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”

3. मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एकमुखाने म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”

4. तेव्हा मोशेने सर्व आज्ञा लिहून काढल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलच्या बारा वंशासाठी, प्रत्येक वंशास एक याप्रमाणे बारा दगड तेथे रोवून स्तंभ उभे केले.

5. मग मोशेने काही तरुणांना यज्ञार्पणे वाहाण्यासाठी पाठवले व त्यांनी परमेश्वराला बैलांची होमार्पणे व शांत्यार्पणे वाहिली.

6. मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त राखून काही भांड्यात ठेवले आणि दुसरे अर्धे रक्त त्याने वेदीवर ओतले.

7. मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”

8. मग मोशेने भांड्यांतील अर्पणाचे रक्त लोकावर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी विशेष करार केला आहे असे हे रक्त दर्शीविते; त्याचे स्पष्टीकरण देवाने दिलेल्या नियमांमध्ये आहे.”

9. नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.

10. तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता!

11. इस्राएल मधील सगव्व्या वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही.मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.”

12. परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांसाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”

13. तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा देवाच्या पर्वतावर चढून गेले.

14. मोशे इस्राएलच्या वडीलधाऱ्या माणसांना म्हणाला, “तुम्ही येथे आम्हासाठी थांबा, मी परत येईपर्यत अहरोन व हूर हे तुम्हावर अधिकारी म्हणून राहतील; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”

15. मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;

16. परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वर मोशेबरोबर ढगातून बोलला.

17. इस्राएल लोकांनी पर्वतावर परमेश्वराचे तेज पाहिले; ते पर्वताच्या शिखरावर भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे होते.

18. मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.

About निर्गम Chapter 24

Read निर्गम Chapter 24 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of निर्गम in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: निर्गम
Chapter: 24
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading निर्गम. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading निर्गम Chapter 24 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is निर्गम Chapter 24?

निर्गम Chapter 24 is part of the Book of निर्गम in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete निर्गम Chapter 24 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. यशया Chapter 58
  2. रूथ Chapter 1
  3. योएल Chapter 3
  4. लेवीय Chapter 6
  5. 2 इतिहास Chapter 15
  6. यहोशू Chapter 11
  7. आमोस Chapter 4

Explore More from निर्गम

  1. निर्गम Chapter 26
  2. निर्गम Chapter 15
  3. निर्गम Chapter 38
  4. निर्गम Chapter 23
  5. निर्गम Chapter 16
  6. निर्गम Chapter 21
  7. निर्गम Chapter 5

Related Chapters & Readings

  1. 2 राजे Chapter 15
  2. 1 शमुवेल Chapter 8
  3. स्तोत्रसंहिता Chapter 29
  4. 2 करिंथकरांस Chapter 13
  5. दानीएल Chapter 5
  6. 2 इतिहास Chapter 8
  7. 1 इतिहास Chapter 18
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *