ईयोब Chapter 35

For English

Read ईयोब Chapter 35 Online

Read ईयोब Chapter 35 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of ईयोब in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of ईयोब and the Holy Bible online.

Choose a Chapter

ईयोब 35

अध्याय 35

1. अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले.तो म्हणाला:

2. “ईयोब, ‘मी देवापेक्षा अधिक बरोबर आहे’ हे तुझे म्हणणे योग्य नाही.

3. आणि ईयोब तू देवाला विचारतोस ‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल? मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’

4. “ईयोब, मी (अलीहू) तुला आणि तुझ्या मित्रांना उत्तर देण्याची इच्छा करतो.

5. ईयोब, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या आकाशाकडे, ढगांकडे बघ.

6. ईयोब, तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही. तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही.

7. आणि ईयोब, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही. देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.

8. ईयोब, तू ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टी करतोस त्यांचा परिणाम तुझ्यावर आणि तुझ्यासारख्या इतरांवर होतो. त्यामुळे देवाला मदत होते किंवा त्याला दु:ख होते असे नाही.

9. “जर वाईट लोकांना दु:ख झाले तर ते मदतीसाठी ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.

10. परंतु जे वाईट लोक देवाकडे मदत मागत नाहीत. ते असे म्हणणार नाहीत: ‘मला निर्माण करणारा देव कुठे आहे? लोक दु:खी कष्टी असले की देव त्यांना मदत करतो. आता तो कुठे आहे?’

11. ‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’

12. “किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही. का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत. असे त्यांना अजूनही वाटते.

13. देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही हे खरे आहे. सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.

14. तेव्हा ईयोब, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही. तू देवाला भेटण्याची आणि त्याला तू निरपराध आहेस हे पटवून देण्याच्या संधीची वाट पहात आहेस असे म्हण.

15. “ईयोब, देव वाईट लोकांना शिक्षा करत नाही असे तुला वाटते. तो पापाकडे लक्ष देत नाही असेही तुला वाटते.

16. म्हणून ईयोब त्याचे निरर्थक बोलणे चालूच ठेवतो. आपण खूप मोठे असल्याचा आव ईयोब आणतो. परंतु आपण काय बोलत आहोत हे ईयोबला कळत नाही हे सहजपणे समजून येते.”

About ईयोब Chapter 35

Read ईयोब Chapter 35 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of ईयोब in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: ईयोब
Chapter: 35
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading ईयोब. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading ईयोब Chapter 35 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is ईयोब Chapter 35?

ईयोब Chapter 35 is part of the Book of ईयोब in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete ईयोब Chapter 35 online for free with easy chapter navigation.

More Chapters from ईयोब

  1. ईयोब Chapter 2
  2. ईयोब Chapter 37
  3. ईयोब Chapter 26
  4. ईयोब Chapter 40
  5. ईयोब Chapter 24
  6. ईयोब Chapter 19
  7. ईयोब Chapter 18

Explore More from जुना करार

  1. यहोशू Chapter 15
  2. उत्पत्ती Chapter 31
  3. 2 इतिहास Chapter 27
  4. 2 इतिहास Chapter 12
  5. स्तोत्रसंहिता Chapter 140
  6. स्तोत्रसंहिता Chapter 58
  7. 1 शमुवेल Chapter 6

Related Chapters & Readings

  1. स्तोत्रसंहिता Chapter 92
  2. स्तोत्रसंहिता Chapter 96
  3. नीतिसूत्रे Chapter 29
  4. 1 शमुवेल Chapter 14
  5. नीतिसूत्रे Chapter 16
  6. यशया Chapter 14
  7. स्तोत्रसंहिता Chapter 26
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *