Read ईयोब Chapter 17 Online
Read ईयोब Chapter 17 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of ईयोब in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of ईयोब and the Holy Bible online.
Choose a Chapter
ईयोब 17
अध्याय 17
1. माझा आत्मा भंगला आहे. मी आशा सोडून दिली आहे. माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे आणि थडगे माझी वाट पाहात आहे.
2. लोक माझ्याभोवती उभे राहातात आणि मला हसतात. ते मला चिडवतात. माझा अपमान करतात. तेव्हा मी फक्त बघत राहतो.
3. “देवा, तुझा मला खरोखरच पाठिंबा आहे हे मला दाखव. दुसरे कुणीही मला पाठिंबा देणार नाही.
4. “तू माझ्या मित्रांच्या मनाची कवाडे बंद करुन टाकलीस आणि आता त्यांना काही कळत नाही. कृपा करुन तू त्यांना विजयी होऊ देऊ नकोस.
5. “लोक काय म्हणतात ते तुला माहीत आहे ‘एखादा माणूस मित्रालामदत करण्यासाठी स्वत:च्या मुलांकडे दुर्लक्ष करतो’ परंतु माझे मित्र मात्र माझ्या विरुध्द गेलेत.
6. देवाने माझे नाव म्हणजे सर्वासाठी एक शिवी केली. लोक माझ्या तोंडावर थुंकतात.
7. दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
8. यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.
9. पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहातात. निष्पाप लोक अधिक सामर्थ्यवान होतात.
10. “पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या. तुमच्या पैकी कुणीही विद्वान नाही.
11. माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.
12. माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधार प्रकाशाला पळवून लावतो असे त्यांना वाटते.
13. “थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो.
14. “तू माझा जन्मदाता आहेस’ असे मी थडग्याला आणि किड्यांना ‘माझी आई’ किंवा ‘बहीण’ म्हणू शकेन.
15. परंतु मला जर तेवढी एकच आशा असेल, तर मला मुळीच आशा नाही. मला जर तेवढी एकच आशा असेल तर लोकांना मी आशे शिवायच दिसेन.
16. माझी आशा माझ्याबरोबरच मरेल का? ती सुध्दा मृत्युलोकात जाईल का? आम्ही बरोबरच मातीत जाऊ का?”
About ईयोब Chapter 17
Read ईयोब Chapter 17 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of ईयोब in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: ईयोब
Chapter: 17
Testament: Old Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading ईयोब. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading ईयोब Chapter 17 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is ईयोब Chapter 17?
ईयोब Chapter 17 is part of the Book of ईयोब in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete ईयोब Chapter 17 online for free with easy chapter navigation.
More Chapters from ईयोब
- ईयोब Chapter 2
- ईयोब Chapter 26
- ईयोब Chapter 37
- ईयोब Chapter 21
- ईयोब Chapter 19
- ईयोब Chapter 6
- ईयोब Chapter 40
Explore More from जुना करार
- लेवीय Chapter 20
- लेवीय Chapter 2
- निर्गम Chapter 40
- यशया Chapter 13
- स्तोत्रसंहिता Chapter 49
- लेवीय Chapter 16
- सपन्या Chapter 2