नहेम्या Chapter 7

For English

Read नहेम्या Chapter 7 Online

Read नहेम्या Chapter 7 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of नहेम्या in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of नहेम्या and the Holy Bible online.

Choose a Chapter

नहेम्या 7

अध्याय 7

1. तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. वेशींवर पहारा करायला माणसे नेमली. मंदिरात गायनाला आणि याजकांना मदत करायला माणसे नेमून दिली.

2. यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गिढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. हनानीची निवड मी केली कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.

3. नंतर हनानी आणि हनन्या यांना मी म्हणालो, “सूर्य चांगला वर येऊन ऊन तापल्यावरच तुम्ही रोज वेशीचे दरवाजे उघडा आणि सूर्यास्तापूर्वीच दरवाजे लावून घ्या. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”

4. आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.

5. तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळयात आधी परत आले त्यांच्या वंशवळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:

6. बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.

7. जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दमानी, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:

8. परोशचे वंशज2172

9. शेफठ्याचे वंशज372

10. आरहचे वंशज652

11. येशूवा आणि यवाब यांच्यावंशावळीतील पहथमवाबचेवंशज2818

12. एलामचे वंशज1254

13. जत्तूचे वंशज 845

14. जक्काईचे वंशज 760

15. बिन्नुईचे वंशज 648

16. बेबाईचे वंशज628

17. आजगादचे वंशज2322

18. अदोनीकामचे वंशज667

19. बिग्वईचे वंशज

20. आदीनाचे वंशज 655

21. हिज्कीयाच्या कुटुंबातीलओटेरचे वंशज98

22. हाशुमाचे वंशज328

23. बेसाईचे वंशज324

24. हारिफाचे वंशज112

25. गिबोनाचे वंशज95

26. बेथलहेम आणि नटोफा यागावांमधली माणसे188

27. अनाथोथ गावची माणसे128

28. बेथ-अजमावेथ मधले लोक42

29. किर्याथ-यारीम, कपीरा व बैरोथया गावातली743

30. रामा आणि गेबा इथली621

31. मिखमास या गावची 122

32. बेथल आणि आय इथली123

33. नबो या दुसऱ्या एका गावची 52

34. एलाम या दुसऱ्या गावची1254

35. हारिम या गावचे लोक320

36. यरीहो या गावचे लोक345

37. लोद, हादीद व ओनो या गावाचे721

38. सनावाचे3930

39. याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदायायाचे वंशज973

40. इम्मेराचे वंशज1052

41. पशहूराचे वंशज1247

42. हारिमाचे वंशज1017

43. लेवीच्या घराण्यातील माणसे पुढील प्रमाणे:होदयाच्या कुळातली कदमीएलच्याघराण्यातील येशूवाचे वंशज74

44. गाणारे असे:आसाफाचे वंशज148

45. द्वारपाल पुढील प्रमाणे:शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबायांचे वंशज138

46. हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज

47. केरोस, सीया, पादोन

48. लेबोना, हगाबा, सल्माई

49. हानान, गिद्देल, गहार

50. राया, रसीन, नकोदा

51. गज्जाम, उज्जा. पासेहा

52. बेसई, मऊनीम, नफूशेसीम

53. बकबूक, हकूफ, हईराचे

54. बसलीथ, महीद, हर्शा

55. बकर्स, सीसरा, तामहा

56. नसीहा आणि हतीफा

57. शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा

58. याला, दकर्न, गिद्देल

59. शफाठ्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईमआणि आमोन.

60. मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज मिळून 392

61. तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:

62. दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज 642

63. आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे:हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्लयच्या वंशजात होई)

64. काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. याजक म्हणून काम करता यावे यासाठी आपण याजकांचेच पूर्वज आहोत हे काही त्यांना सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांना याजक म्हणून सेवा करता आली नाही. त्यांची नावे याजकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली नाहीत.

65. अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत त्यांनी या अन्नातले काही खायचे नव्हते.

66. परत आलेल्या जथ्थ्या मध्ये सगळे मिळून एकंदर 42360 लोक होते. यात 7337 स्त्री-पुरुष सेवकांची गणना केलेली नाही. शिवाय त्यांच्यामध्ये 245गायकगायिका होत्या.

68. त्यांच्याजवळ 736घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6720 गाढवे होती.

70. घराण्यांच्या काही प्रमुखानी कामाला हातभार म्हणून पैसे दिले. राज्यपालने एकोणिस पौंड सोने भांडाराला दिले. शिवाय पन्नास वाडगे आणि याजकांसाठी 530 वस्त्रे दिली.

71. घराण्याच्या प्रमुखांनी कामाला साहाय्य म्हणून भांडाराला 375पौंड सोने दिले. याखेरीज 1 1/3 टन चांदी देखील दिली.

72. इतर सर्व लोकांनी मिळून 375पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67वस्त्रे दिली.

73. अशाप्रकारे याजक, लेवींच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.

About नहेम्या Chapter 7

Read नहेम्या Chapter 7 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of नहेम्या in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: नहेम्या
Chapter: 7
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading नहेम्या. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading नहेम्या Chapter 7 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is नहेम्या Chapter 7?

नहेम्या Chapter 7 is part of the Book of नहेम्या in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete नहेम्या Chapter 7 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. यशया Chapter 58
  2. रूथ Chapter 1
  3. उत्पत्ती Chapter 8
  4. जखऱ्या Chapter 6
  5. यशया Chapter 18
  6. उपदेशक Chapter 4
  7. 2 इतिहास Chapter 2

Explore More from नहेम्या

  1. नहेम्या Chapter 13
  2. नहेम्या Chapter 10
  3. नहेम्या Chapter 5
  4. नहेम्या Chapter 6
  5. नहेम्या Chapter 4
  6. नहेम्या Chapter 11
  7. नहेम्या Chapter 8

Related Chapters & Readings

  1. लेवीय Chapter 1
  2. नीतिसूत्रे Chapter 15
  3. स्तोत्रसंहिता Chapter 92
  4. अनुवाद Chapter 10
  5. याकोब Chapter 5
  6. यशया Chapter 47
  7. लेवीय Chapter 18
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *