लूक Chapter 13

For English

Read लूक Chapter 13 Online

Read लूक Chapter 13 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of लूक in the New Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of लूक and the Holy Bible online.

Choose a Chapter

लूक 13

अध्याय 13

1. त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलातानेआधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते.

2. त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरंनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते?

3. नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल.

4. किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते?

5. नाही, मी तुम्हांला सांगतो जर तुम्ही पश्चत्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”

6. नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही.

7. म्हणून तो माळयाला म्हणाला, “पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’

8. माळयाने उत्तर दिले, “मालक, या एका वर्षासाठी ते राहू द्या. मग मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन.

9. मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.”

10. शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.

11. तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने अठरा वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते.

12. येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!”

13. नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.

14. नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बाथ दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”

15. येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. “ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?

16. ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?”

17. तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करु लागला.

18. मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करु

19. देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाडे झाले. आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”

20. तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करु

21. ते खमिरासरखे आहे. एका स्त्रीनेे तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”

22. येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता.

23. कोणीतरी त्याला विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?”तो त्यांना म्हणाला,

24. “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.

25. जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील, तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, “प्रभु, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हांला उत्तर देईल, “तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.’

26. नंतर तुम्ही म्हणाल, “आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!’

27. आणि तो तुम्हांला म्हणेल, “तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा.”

28. तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वत: मात्र बाहेर फेकलेले असाल.

29. आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील.

30. लक्षात ठेवा की, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”

31. त्यावेळी काही परुशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हांला ठार मारणार आहे.”

32. येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, “ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’

33. तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांने यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.

34. “यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कितीतरी वेळा कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती.

35. पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हांला सांगतो, “देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो’असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”

About लूक Chapter 13

Read लूक Chapter 13 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of लूक in the New Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: लूक
Chapter: 13
Testament: New Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading लूक. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading लूक Chapter 13 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is लूक Chapter 13?

लूक Chapter 13 is part of the Book of लूक in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete लूक Chapter 13 online for free with easy chapter navigation.

More Chapters from नवा करार

  1. फिलेमोन Chapter 1
  2. लूक Chapter 12
  3. योहान Chapter 19
  4. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 3
  5. योहान Chapter 9
  6. लूक Chapter 1
  7. मत्तय Chapter 9

Explore More from लूक

  1. लूक Chapter 11
  2. लूक Chapter 21
  3. लूक Chapter 10
  4. लूक Chapter 20
  5. लूक Chapter 12
  6. लूक Chapter 22
  7. लूक Chapter 9

Related Chapters & Readings

  1. 1 करिंथकरांस Chapter 8
  2. स्तोत्रसंहिता Chapter 103
  3. निर्गम Chapter 16
  4. इफिसकरांस Chapter 3
  5. प्रकटीकरण Chapter 10
  6. यशया Chapter 7
  7. स्तोत्रसंहिता Chapter 140
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *